
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अधिकारी गट-ब बीएएमएस अनेक वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात वैद्यकीय अधिकारी गट अ च्या जागा हजाराहून रिक्त आहेत. या रिक्त जागेवर बीएएमएस-ब वैद्यकीय अधिकारी यांना समाविष्ट केल्या जाऊ शकते. याबाबत राज्यातील सर्व खासदार व आमदार यांचे शिफारस पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना देण्यात आले आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना शासनाने पदोन्नती पात्र अधिकाऱ्यांची यादी प्रकाशित केली होती व त्यांच्याकडून पदोन्नतीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते; परंतु तेव्हापासून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही . आज रोजी राज्याच्या आदिवासी दुर्गम, नक्षलग्रस्त ग्रामीण भागात फक्त बीएएमएस वैद्यकीय अधिकारीच सेवा देत आहेत. कित्येक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेमुळे अधिकारीवर्गात असंतोष व नैराश्य निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाचे धोरण फार उदारमताचे आहे. मुख्यमंत्री यांनी वैद्यकीय अधिकारी गट-ब पदोन्नतीबाबत लवकर निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. वैद्यकीय अधिकारी गट-ब यांची पदोन्नती करून न्याय देतील, अशी अपेक्षा शासन दरबारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी यांची बरेच वर्षांपासून पदोन्नती न केल्यामुळे एकाच पदावर त्यांना वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने यासर्व बी ए एम एस वैद्यकीय अधीकारी यांच्या पदोन्नती चा मार्ग लवकर मोकळा करावा अशी मागणी करण्यात येत आहे…
