कोळी येथे पोळा उत्साहात साजरा.

कृष्णा पाटील चौतमाल जिल्हा प्रतिनिधी नांदेड

हदगांव – तालुक्यातील कोळी येथे पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षी पेक्षा या वर्षी पोळा सनाला वेगळा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात सन समारंभ बंद करण्यात आले होते. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या वर्षी पोळा सन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील बैलांची गर्दी ओसंडून वाहताना दिसली. बैल मिरवताना शेतकऱ्याच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसत होता .