आदिवासी एकता महोत्सव कार्यक्रम संदर्भाने पत्रकार परिषद संपन्न,बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर सह कार्यकर्त्ते उपस्थित

प्रतिनीधी नितेश ताजणे

वणी : तालुक्यामध्ये ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधून येत्या २० ऑगस्ट २०१३ ला वणी येथील बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या बतीने आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन थाटामाटात करण्यात येणार आहे. आदिवासी एकता महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम हा तिन सत्रात विभागला आहेत. सदर कार्यक्रम हा नियोजीत वेळेनुसार होणार असल्याने नागरीकाची गैरसोय होणार नसल्याचे आयोजकाकडून बोलण्यात आले आहेत. प्रथम स्थात डॉ. संचिता नगराळे याच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशभाऊ कुळमेथे भुषवणार आहे. विपेश अतिथी म्हणून विश्वास नांदेकर, इजहार शेख, विजय नगराळे, निळकंठजी जुमनाके, देविदास चांदेकर, डॉ. गजानन मेश्राम, आनंदरावजी आत्राम, सुभाषजी आत्राम, दिलीप भोयर, अजय धोबे, मंगलजी तेलंग, नइम अजित, संबा वाकुजी बाघमारे, राजुभाऊ तुराणकर, प्रविण खानझोडे, राहुल आत्राम, कैलास आत्राम, हरिभाऊ रामपुरे, व इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवराच्या उपस्थीतीत उद्घाटनीय सोहळा पार पडणार आहे.