आज हिमायतनगर येथे सर्व रोग निदान उपचार शिबिराचा माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुलसीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

आज दिनांक 13/ऑगस्त रोजी हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजीत करण्यात आले सर्व रोग निदान व उपचार शिबीराचा शुभारंभ राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांच्या. शुभ हस्ते आज करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना मा. संजय भाऊ राठोड यांनी संबोधित केले. शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना या योजनांचा लाभ देऊन आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरास खासदार हेमंत पाटील, डॉ. बी. एन. चव्हाण शिवसेना उप जिल्हा प्रमुख मा. चिंतगराव कदम सर शिवसेना संपर्कप्रमुख व मा. प्रवीण पाटील मिरासे शिवसेना तालुकाप्रमुख मा. राजू राठोड शिवसेना तालुका प्रमुख महागांव आ.बालाजी कल्याणकर, आयोजक तथा माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.