वरोरा येथे संविधान निर्मातीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे दिनाचे औचित्य साधून दिवसीय संविधान दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर चौक वरोरा येथे संविधान निर्मितीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २६ व २७ नोव्हेंबर असा दोन दिवसीय संविधान दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ नोव्हेंबर ला सकाळी राष्ट्रध्वज व संविधान सन्मान बाईक रॅली शहारातून काढण्यात आली ती अनेकांचे लक्ष आकर्षित करुन लक्षवेधी ठरली तसेच सायं ५.०० वाजता निखिल राणे आणि संच यांचा भिम जलसा हा गायनाचा कार्यक्रम व त्यानंतर मा.अशोक वानखेडे, जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक,नवी दिल्ली यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमादरम्यान डॉ.रंगश्याम मोडक लिखित ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व आदिवासी समाज’ या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय बोधे , स्वागताध्यक्ष ॲड अरविंद पेटकर,उद्घाटक डॉ उन्मेष भुजाडे , प्रमुख उपस्थिती ॲड भुपेंद्र रायपुरे तर मुख्य मार्गदर्शिक म्हणून मा. अशोक वानखेडे,नवी दिल्ली हे होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन संजय नळे, प्रास्ताविक प्रकाश गायकवाड तर आभार गुलाब बागेसर यांनी केले.
दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला सायं . ३.०० वाजता २५ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते त्यानंतर सेवानिवृत्त लोकांचा इतर दखल पात्र व्यक्ती अशा ३५ लोकांचा सत्कार करण्यात आला.सायं.७.०० वाजता शिवशाहीर भगवानदादा गावंडे यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. दोन ही दिवशी कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग दर्शविला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.