रोटरी क्लब हिंगणघाट च्या अध्यक्षपदी सी.ए. जितेंद्र वर्मा , उपाध्यक्षपदी शाकीरखान पठाण तर सचिवपदी सुभाष कटारीया व उदय शेंडे


प्रमोद जुमडे/हिंगणघाट


हिंगणघाट: स्थानिक रोटरी क्लबचा २०२४-२५ चा पदग्रहण समारंभ मोहता भवन येथे नुकताच पार पडला. या समारंभात सी.ए. जितेंद्र वर्मा यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी रो. सुभाष कटारीया व उदय शेंडे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नेत्र रोग तज्ञ डॉ. अनिल लध्दड (नागपुर), सीए राजेंद्रजी भुतडा (वर्धा), महेश पोद्दार (सहप्रांतपाल, वर्धा), मुकुंद मुंधडा (सहप्रांतपाल). माजी सचिव पितांबर चंदानी, केदार जोगळेकर, शाकिरखान पठाण मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रोटरीचे जनक पॉल हॅरीस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आली.

या सत्रात आलेल्या नविन सभासदांचे सहपरीवार रोटरीत स्वागत करण्यात आले. मावळते अध्यक्ष व सचिवांनी नविन पदाधिकार्‍यांना आपला पदभार स्वाधीन केला. मावळते अध्यक्ष रो. राजु निखाडे यांनी वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी वर्षभरात घेणार असलेल्या कार्याचा आढावा दिला.

मुख्य अतिथी डॉ. अनिल लध्दड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रोटरीचे कार्य समाजाला दिशा देण्याचे आहे. समाजावर आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी रोटरी सदैव हजर असते, याचे उदाहरण पोलिओ व कोरोना सारख्या संकटांच्या काळातील कार्यातून दिसून येते.

सीए राजेंद्रजी भुतडा यांनी ‘सेव वॉटर, सेव लाईफ’ याचे महत्व सांगितले. पाण्याचा जपून वापर केला नाही तर पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी अश्रू गाळावे लागतील असे प्रतिपादन त्यांनी केले. सहप्रांतपाल रो. महेशजी पोद्दार व मुकुंद मुंधडा यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. माया मिहानी व रो. मंजुषा मुळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक बोंगिरवार, हिमानी त्रिपाठी व सारीका दाभाडे यांनी करून दिला. होणार्या प्रोजेक्ट बद्दल उदय शेंडे यांनी माहीती दिली. आभार प्रदर्शन सुभाषजी कटारीया यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक मुखी, , पीतांबर चंदानी, डॉ. रमेश रंका, डॉ. प्रकाश लाहोटी, मुरली लाहोटी, सुरेश चौधरी, पराग कोचर, केदार जोगलेकर, प्रभाकर साठवने ,मितेश जोशी, पुंडलिक बकाने, कृष्णा जोशी, वैभव पटेलिया, , पंकज देशपांडे यांनी सहकार्य केले.