वाहतूक विभागाचा आंधळा कारभार, गाडी कुणाची चालन कुणाला

संपादक : प्रशांत बदकी ,वरोरा

वरोरा :- वरोरा तालुक्यातील रहिवाशी यांना महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभाग द्वारा पोलीस अधिकारी अक्षय सांगळे यांनी त्यांच्या वाहनावर दंड ठोकल्याची चालान देण्यात आली मात्र वाहतूक पोलिसांनी पाठविलेल्या गाडीचा फोटोत दुसरीच गाडी दर्शविल्याने हा प्रकार समोर आला.
तालुक्यातील चिकणी येथील रहिवाशी मोहसीन खा मुनाफ खा पठाण यांना दि. 19 ऑगस्ट रोजी आपली दुचाकी गाडी क्रमांक MH 34 BK 7231 या गाडीने प्रवास करीत असताना वाहतूक विभागाद्वारे बिना हेल्मेट गाडी चालवितांना( MVA )मोटर वेहिकल अॅक्ट सेक्शन 129/194 ( D ) नुसार एक हजार रुपयाचा दंड ठोटविण्यात आला. याचा पुरावा म्हणून मोसिन खा मुनाफ खा पठाण यांच्या मोबाईल क्रमांकावर दंडाच्या विवरणाबद्दल माहिती पाठविण्यात आली त्यात पुरावा म्हणून एक्टिवा MH 34 BK 7271 क्रमांकाच्या एक्टिवा मोपेड चे फोटो पाठविण्यात आले. हे बघून वाहनधारकाला धक्काच पोहोचला कारण सदर व्यक्तीकडे MH 34 BK 7231 क्रमांकाची बाईक असून वाहतूक पोलिसांनी मला दंडाची पावती पाठविलीच कशी यावरून महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला असून करणी कुणाची आणि भरणी कुणाला असा काहीसा प्रकार घडलेला दिसून येत आहे.
तेव्हा वाहतूक विभागाचा आंधळा कारभार समोर आला असुन गाडी कुणाची चालन कुणाला असाच प्रकार अनुभवल्या जात आहे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सर्व प्रकारावर गांभीर्याने दखल घेतील का? संबंधित वाहनधारकाला न्याय देऊन यावर लागण्यात आलेला दंड रद्द करतील काय याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.