
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरचे दागिने मोडून टाकतात तसेच चित्र यंदाही कायम असून शेतकरी आपल्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दाग दागिने मोडून किंवा गहाण ठेवून हिरवे स्वप्न साकारण्यासाठी बी बियाणे खते खरेदी करतांना दिसून येत आहे.
राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल भाग असून तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे नसल्याने मुख्य व्यवसाय हा शेती आहे. विशेषता खरीप हंगामावर सर्वच शेतकऱ्यांचे पुढील वर्षभराचे अर्थचक्र विसंबून असते या हंगामात पेरणी लायक असलेले एकरभर क्षेत्रही पेरणी विना रिक्त ठेवले जात नाही मात्र पूर परिस्थिती उदभवण्यासह अतिवृष्टी होऊन शेत जमीन खरडून जाणे पेरणी झाल्यानंतर पावसाने दीर्घ दंडी मारणे किंवा अधिक पाण्याने जमीन चिबडून पेरणी उलटणे पुराचे पाणी शेतात शिरून पेरलेले किंवा अंकुरलेले बियाणे वाहून जाणे आदी स्वरूपातील संकटे देखील याच हंगामात शेतकऱ्यांसमोर उभे टाकतात.मागील हंगामात सुद्धा जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अक्षरशा हिरावून घेतला होता त्यामुळे अतिवृष्टी होऊन शेतातील होत्याचे नव्हते झाले त्यातच निघालेल्या शेतातून उत्पादनाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे अशाही बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी हिम्मत सोडलेली नाही आर्थिक अडचणीवर मात करून पुन्हा एकदा यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाले आहेत त्याचे मनोबल वाढविण्याकरिता तथा आर्थिक संकटात सदैव साथ देण्याचे जणू वचन देत शेतकऱ्यांच्या बायका अंगावरील दागिने मोडून घर धन्याचे मदतीला पुन्हा एकदा सक्षम पणे पुढे आल्याचे दिसून येत आहे दरम्यान पेरणीला दमदार पाऊस होऊन किमान यंदा तरी विक्रमी उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा बाळगून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
