संगीत जगण्याची नवी उमेद देते:प्रा वसंत पुरके,पत्रकारदिनाच्या पूर्वसंध्येला स्वरांजली कार्यक्रमात प्रतिपादन

7

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


संगीतामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलते माणसाला संगीताचे ,रागाचे ,वाद्याचे ज्ञान असल्यास माणूस ईडीच्या कार्यवाह्या करीत नाही जीवनात कितीही चढउतार आल्यास त्याचा सामना करण्याची, त्याच्याशी लढा देण्याची ताकद संगीतातून मिळते ,संगीत जगण्याची नवीन उमेद देते असे विचार प्रा वसंत पुरके यांनी मांडले राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला स्वरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी पुरके सर बोलत होते यावेळी गीत मुझीकल इव्हेंट अमरावती यांनी स्वरांजली हा कार्यक्रम सादर केला मुख्य गायिका प्रतीक्षा डांगे गायक राहुल तायडे यांनी हा कार्यक्रम सादर केला वादक म्हणून प्रवीण जोंधळे ,आकाश थोरात ,विनोद थोरात ,वीरेंद्र गावंडे तर निवेदक म्हणून तेजस बोरकर उपस्थित होते यावेळी सूर निरागस हो ,माझे माहेर पंढरी सारखे भक्तीगीत तेरे रष्के कदम इशक सुफीयाना, सोलह बरसकी बाली उमर को सलाम आदी रोमँटिक गीत तर सायोणारा ,पंख होती तो उड आती रे सारखे जुने गीत यावेळी सादर करण्यात आले तसेच प्रेक्षकांच्या आग्रहास्तव प्रा वसंत पुरके यांनी पिकला पाण्याचा देठ की हो हिरवा हे गीत सादर केले यावेळी पुरके सरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तर यवतमाळ येथील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर प्रताप तारक यांचाही यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यांनीही हे गीत सादर केले तर पत्रकार संघटनेचे सदस्य व नगरसेवक मंगेश राऊत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गजानन काळे यांनी पत्रकार संघटनेला मदत केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अशोक पिंपरे यांनी पाहुण्याच्या सत्कार पत्रकार संघटनेचे सचिव फिरोज लाखानी यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे यांनी केले कार्यक्रमाला सदष्य डॉ कैलास वर्मा ,महेश शेंडे,मोहन देशमुख, मंगेश राऊत, महेश भोयर ,संजय दुरबुडे, रामू भोयर ,दीपक पवार संजय दुरबुडे राष्ट्रपाल भोंगाडे प्रकाश मेहता विनोद चिरडे सर ,मनोहर बोंभाटे विलास साखरकर विकास ठाकरे , प्रविण गायकवाड, गजानन ठूणे , शंकर वरगट ,शालिक पाल , अरविंद तेलंगे , सचिन राडे ,राजू काळे अनेक पत्रकार उपस्थित होते