
संपूर्ण जगात कोरोना ने हाहाकार माजविला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगांव – हिमायतनगर मतदार संघात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे जनता भयभीत झालेली आहे. अशा बिकट परिस्थितीत आणि संसर्गाची भीती असताना सुद्धा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वारंवार कोरोनासेंटर तसेच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचे धीर देण्याचे काम करत आहेत तसेच ज्यांना रेमडेसीवीर इंजेक्शन ची आवश्यकता आहे त्यांना इंजेक्शन उपलब्ध करून देणे ज्या रुग्णांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे त्यांच्यासाठी बेड तसेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नागेश पाटील रात्रंदिवस कार्यरत आहेत. हदगाव येथील रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून नांदेडला मिळणाऱ्या सर्व सुविधा हदगाव च्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यांच्या या कार्यामुळे कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण त्यांचे आभार मानत आहे.

माझा कोरोना चा स्कोअर 22 होता मी खूप घाबरलो होतो परंतु माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी मला खूप धीर दिला तसेच माझ्या इंजेक्शनची व्यवस्था केली त्यामुळे मी आता ह्या कोरोनाच्या रोगातून पूर्णपणे बरा झालेले आहे अष्टीकर साहेबांनी माझ्यासाठी जे काही केले त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे.
अविनाश सोनटक्के हदगाव.
माझ्या कुटुंबतील दोन व्यक्ती कोरोना मुळे मृत पावली आहेत परंतु तिसरी व्यक्ती कोरोना शि
झुंज देत असताना मी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांना संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब इंजेक्शनची व्यवस्था करून तसेच आम्हाला धीर दिल्यामुळे मी तिसऱ्या व्यक्तीला या कोरोनाच्या महामारी तून वाचवू शकलो याचे सर्व श्रेय माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांना जाते मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील. सचिन देवराये कामारी
