विश्व हिंदू परिषद राळेगाव प्रखंड अध्यक्ष पदी : किरण शेजुळं

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

दि. १८/०६/२०२३ रोजी यवतमाळ येथे विश्व हिंदू परिषद ची विभागीय बैठक पार पडली त्यात विश्व हिंदू परिषदेचे सर्व मुख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, त्यात सर्वानुमते वडकी येथील रहिवासी किरण शेजुळ यांना राळेगाव प्रखंड अध्यक्ष म्हणून जवाबदारी देण्यात आली, त्यांचे मागील काळातील देव, देश, धर्मा बद्दल केलेल्या कामाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल त्यांना ही मुख्य जवाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत असून, त्यांना मुख्य जबाबदारी मिळाल्याने सर्व स्थरावरून त्यांचे कौतुक होत आहे, भविष्यात आणखी मोठे संघटन उभे करून समाजातील प्रत्येक क्षेत्रा करीता काम करायचे आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष किरण भाऊ शेजुळ यांनी दिली