राजकीय पुढाऱ्यांना थोर पुरुष आणि क्रांतिकारी पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी करण्यासाठी स्वताच्या कार्यक्षेत्रात का? विसर पडतोय – मधुसूदन कोवे


सहसंपादक-रामभाऊ भोयर


विर बाबुराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल ग्रामीण भागात गावा गावात जयंती साजरी करण्यासाठी गरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी समाजातील लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि विशेष सामाजिक सांस्कृतिक मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते आम्ही उपस्थित मान्यवर म्हणून मा.बळवंतराव मडावी, प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, आणि मा, मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी दापोरी ( क ) ता राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे उपस्थिती दर्शविली – दापोरी गावात प्रवेश करताच गावकऱ्यांनी एकत्र येऊन जंगी स्वागत केले मोठा आनंद झाला पण दुःख या गोष्टींचे वाटले की, या कार्यक्रमात राजकीय पुढारी का? नाही हे सामाजिक दुर्दैव आहे.एक सत्ताधारी “रेडीमेड सभा”‘ आपली सामाजिकता दाखवतो आणि माजी लोकप्रतिनिधी आपल्या वावरात लोक गोळा करतो हे दुर्दैव आहे ह्यांनी आपल्या राजकीय कार्य क्षेत्रात जाऊन लोकांना सामाजिक मार्गदर्शन का करतं नाही असा प्रश्न आदिवासी समाजातील लोकांना मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केला आहे – विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त विविध संघटना चे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते मा विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा, कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ विजया रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव गोंडवाना गणतंत्र पार्टी ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ गोंडवाना गणतंत्र पार्टी वसंतराव सोयाम झाडगाव रवींद्र परचाके अंतरगाव मदन कुमरे सावनेर भाऊराव सिडाम सोनेगाव रेखाताई जयश्री मेश्राम आमला कलावती ऊईके पाथ्रड हणुमान टेकाम तालुका अध्यक्ष कळंब गोंडवाना गणतंत्र पार्टी राजेंद्र मडावी तरोडा सुमनबाई घोडाम वाऱ्हा इंदिराबाई हर्षल आडे जिल्हा संघटक यवतमाळ गोंडवाना गणतंत्र पार्टी समीर कुमरे उमेश उईके राळेगाव मरस्कोले, मंगला टेकाम, अनेक समाज बांधव अनेक गावांतील सर्व घटकांतील नागरीक विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त उपस्थित होते.