सीता माता मंदिर रावेरी येथे शरदजी जोशी यांना श्रद्धांजली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सीता माता मंदिर राळेगांव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व शरदजी जोशी यांना एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली .रावेरी आणि स्व शरदजी जोशी यांचे ऋणानिबंध कायमच राहिले आहे .सीता माता मंदिराच्या उद्धारासाठी खासदार निधी मधून मोठा निधी,याच प्रमाणे शेतकरी संघटनेची दोन मोठी अधिवेशने त्यांनी रावेरीलाच भरवली होती .त्यांच्या स्मूती ला उजाळा देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते नारायणराव काकडे होते ,हनुमंतराव उगेमुगे,सुरेशराव आगलावे,मुरलीधरराव एम्बडवार, विक्रमजी फटींग,भावरावजी पिंपरे, सुधाकरराव काकडे,रामकृष्णजी कारमोरे, बबाबारावजी काकडे,नामदेवराव काकडे,तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.