
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशक फवारणीबाबत योग्य जनजागृती निर्माण व्हावी यासाठी राळेगाव येथे “फवारणी जनजागृती रथ” मोहिमेला गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
या अभियानाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अॅण्ड रिफॉर्म (ISAR), यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
१६ जुलै रोजी पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने या रथद्वारे कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी व उपायांबाबत जनजागृती करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप करण्यात आले तसेच सुरक्षित फवारणीबाबत सखोल माहितीही देण्यात आली.या वेळी सहायक गटविकास अधिकारी भारती इसळ, कृषी अधिकारी मनीषा पाटील, कृषी अधिकारी राजश्री ठाकरे, कृषी विस्तार अधिकारी बनकर, व पंचायत समितीतील अधिकारी उपस्थित होते.
