दुष्काळी भागात फुलवली फळबाग,सीताफळाचे यशस्वी लागवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा म्हणुन ओळख असलेला यवतमाळ
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालनगर हे गाव आदिवासी बहुल मानले जाते डोंगर माथ्यावर वसलेलं गाव आहे.
गाव अगदी छोटसं. सतत पाण्याची कमतरता आणि खडकाळ जमीन यामुळे अधिक उत्पन्न मिळणे कठीण आहे. परंतु अशा खडकाळ जमिनीवर देखील अधिक उत्पन्न काढता येऊ शकते, अशा निश्चय गावातील तथा कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव चे संचालक नीच्छल बोभाटे यांनी केला. अनेक वर्षापासून पारंपारिक शेती करत होते मात्र कृषी विभागातील कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत सिताफळ या फळपिकाची ३ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण पणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. या वेळी शेतकरी नीच्छल बोभाटे इतर पिक घेताना अनेक संकटे शेतकऱ्यांना येतात व कधीकधी खर्चसुध्दा वसुल होत नाही. मी पीक पध्दतीत बदल करुन दीड ते दोन किलो मिटर अंतरावरून दुसऱ्या शेतातून अंडरग्राउंड पाईप लाईन बसवली व कृषी विभागाच्या मदतीने ठिबक सिंचन चा लाभ घेतला व २०२० मध्ये शिताफळ या फळपिकाची लागवड केली . पूर्ण पने सेंद्रिय पद्धतीचा वापर करत आहो असे सांगितले. एनएमके गोल्डन या जातीच्या वाणाची लागवड केली आहे सिताफळाचे उत्पन्न मिळाल्या नंतर प्रधान मंत्री सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत शिताफळा पासून पल्प तयार करण्याचा उद्योग कृषी विभागाच्या मदतीने घेणार असे तालुका कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यवतमाळ अमोल जोशी यांच्या भेटीदरम्यान सांगितले. व त्यांचे फळ देऊन स्वागत केले यावेळी कृषी सहाय्यक मेश्राम, इतर शेतकरी सुरपाम, नितीन कोल्हे , उपस्थित होते.