

रूट मार्चमध्ये एसआरपी प्लाटूनचे जवान, शहर पोलिस सहभागी
वरोरा:- सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या अनेक सणाला
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वरोरा पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले.
गणेश उत्सव, ईद ए मिलाद या सणांमध्ये हिन्दू मुस्लिम बांधव, गणेश मंडळांनी शांतता राखून गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन या वेळी पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या वतीने करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी नयमी साटम यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलिसांकडून गणेश चतुर्थी , ईद च्या अगोदरपासूनच शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करीत गांधी चौक, आंबेडकर चौक, डोंगरवार चौक या ठिकाणी मार्गक्रमण केले . शहरातील गणेश मंडळांनी, मुस्लिम बांधवानी कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही यासाठी काळजीपूर्वक लक्ष देणे, गणेश मंडळांचा शहरातील वाहतुकीस अडथळा होवू नये व गणेशोत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन वरोरा पोलिसांतर्फे करण्यात आले. या पथनसंचलनात
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक मसराम सर यांच्यासह राखीव पोलीस दलांच्या जवानांसह अनेक पोलीस कर्मचारी यात सहभागी होते
