
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गावात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज बस स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून निघाला. तसेच गावात विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालय व मंदिरात सुद्धा तेवढ्यात उत्साहात शिवजयंती साजरी केली गेली. काल महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी महादेव मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात बऱ्याच जणांनी पोवाडे व छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा केला. तसेच महिलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव करून सुबक अशी रांगोळी ची आरास काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते त्यामुळे शिवजयंती महिलांनी सुद्धा तेवढ्याच थाटामाटात साजरी केली. . व दुपारी भव्य दिव्य अशी मिरवणूक मार्गे गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मध्ये तरुणांबरोबरच चिमुकली व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील तेवढ्याच प्रमाणात दिसून आला.दुपारी ३ वाजता नंतर भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यात तरुणाईचा उत्स्पृत असा प्रतिसाद दिसून आला.मोटार सायकलला भगवा ध्वज,तर कुणाच्या मोटार सायकल ला छत्रपती शिवराय असलेला ध्वज, व तरुणांनी भगवा पेठा बांधून शिवरायांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणांनी ढाणकी नगरी दुमदुमून निघाली.
व रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान जयघोष शिवरायांचा स्टँड डीजे वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर ठेकाघेत तरुणाई व चिमुकल्यांनी आनंद घेतला. पोलिस प्रशासनानी विशेष कामगिरी बजावली जागोजागी पोलिस बंदोबस्त होता.कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता अतिशय शांततेत शिवजयंती साजरी केली गेली.
