वडकी येथे शिवजयंती महोत्सवा निमित्य चार दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांच्या रयतेचे राज्य विचारधारेची ओळख व्हावी व प्रबोधनाचा जागर घडावा त्यातून प्रेरणा घेऊन समतेवर आधारित राष्ट्र निर्माण व्हावे या उद्देशाला समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती वडकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिं १६ फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ ला राळेगाव चौफुली उड्डाणपूल येथे करण्यात आले आहे.
यावेळी पुढील कार्यक्रम दिं १६ फेब्रुवारी २०२३ रोज दुपारी १२ वाजता भोई समाज मंदिर वडकी येथे वर्ग ४ थी ते वर्ग ८ वी पर्यंतच्या मुलांकरिता छत्रपती शिवाजी महाराज जीवनावरील स्पर्धा परीक्षा,दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वर्ग ४ थी ते वर्ग ९ वी पर्यंतच्या मुलांकरिता चित्रकला स्पर्धा.त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता रांगोळी स्पर्धा,नंतर सायंकाळी ४ वाजता किल्ले प्रदर्शन होणार असून या सर्व स्पर्धेमध्ये विविध प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या अटी पुढील प्रमाणे असून स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य सोबत आणावे,तसेच रांगोळी स्पर्धेकरिता वयाची अट नाही,किल्ले प्रदर्शनासाठी वयाची अट नाही,किल्याची प्रतिकृती घरूनच तयार करून आणावी. प्रदर्शनी स्थळ भोई समाज मंदिर वडकी येथे होणार आहे.
तसेच या स्पर्धेतून येणाऱ्या क्रमांकाला पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर दि १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवजन्मोत्सव भव्य शोभायात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दिं २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पिंपळापूर रोड वडकी येथे नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत (वयोगट दहा वर्ष )असणार आहे यामध्ये मूल मुली सहभाग घेऊ शकतात.
या सोहळ्याला उपस्थित मान्यवर ग्रा.पं वडकीच्या सरपंच सौ मोनिका देठे,माजी जी.प सदस्या सौ प्रीतीताई काकडे,माजी जी.प सदस्य प्रवीण कोकाटे,माजी जी.प सदस्या अर्चनाताई राऊत.ठाणेदार पो,स्टे वडकी विजय महाले,उपसरपंच शैलेश बेलेकर,ग्रा,पं सदस्य सागर इंगोले,माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,माजी सरपंच दिलीप कडू,मनोज भोयर,सामाजिक कार्यकर्ता बाबाराव महाजन,व्यंकटेश नगरीचे निलेश गुंडावार,सामाजिक कार्यकर्ता किशोर पवार,स्मॉल वंडर कॉन्व्हेंटच्या कु,मंजुषा सागर,सामाजिक कार्यकर्ता अरविंद ठाकरे,सामाजिक कार्यकर्ता गुलाबरावजी पंधरे
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असून या सांस्कृतिक व शोभायात्रा कार्यक्रमाला परिसरातिल समस्त नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शिवगर्जना मित्र परिवार तसेच सर्व वडकी वासीयांतर्फे करण्यात आले आहे.