संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

राळेगाव :येथील संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे दि. १५ फेब्रुवारी २०२३ ला संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.
त्यानिमित्ताने प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांनी केले व संत सेवालाल महाराज यांच्या मानवतावादी विचारकार्याची माहिती देऊन त्यांच्या गोरमाटी बंजारा भाषेतील १० सुवचने व दोहे मराठी भाषेत अनुवादनासह अध्यक्षीय भाषणात सांगण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन राकेश नक्षिणे यांनी तर आभार दिनकर उघडे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.