सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगाव ची नगराध्यक्ष यांनी केली तक्रार, वरिष्ठ अभियंता यवतमाळ यांच्या कडे तक्रार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात काही प्रभागात विकास कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगाव चे वतीने राळेगाव चे आमदार अशोक उईके यांच्या निधीतून आयोजित केले होते, ह्या सर्व विकास कामाचे ठराव नगरपंचायत राळेगाव च्या कार्यकारिणीने सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतले होते, पण प्रत्यक्ष भूमिपूजन करतांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगाव चे उपविभागीय अभियंता,व संबंधित अभियंता यांनी विकास कामांचे भूमिपूजन करतांना जे फलक लावले त्या फलकावर जाणीवपूर्वक नगरपंचायत चे नगराध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची नावे लिहिण्यात आली नाही व भूमिपूजन कार्यक्रमाचे साधे निमंत्रण नगरपंचायत अध्यक्ष,प्रभाग सदस्य, बांधकाम सभापती, यांना देण्यात आले नाही, ही बाब अत्यंत निंदनीय असून त्या फलकावर भाजपा चे आजी माजी पदाधिकारी यांची नावे दिसून येत असल्याने प्रभागातील नागरीकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली,निधी कुणीही दिला असला तरी त्या विभागातील सत्ताधारी किंवा नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेले नगराध्यक्ष व प्रभागाचे नगरसेवक यांना बोलावने आवश्यक आहे मात्र विकास कामांचे ठराव नगरपंचायत ने करायचे आणि श्रेय इतरांनी घ्यावे ही बाब नगरपंचायत कार्यकारिणीतील बहुतांश सदस्यांना रुचली नाही आपला जाणीवपूर्वक अवमान करण्यात आल्याची भावना प्रकट झाल्याने, या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आली, लोकप्रतिनिधी यांच्या दबावात येऊन अधिकारी वर्ग मनमानी करत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू असे निवेदनात नमूद करण्यात आले, यावेळी नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेद्र तेलंगे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धवल घुंगरूड, शेशांक केंढे, अफसर अली सैयद, अंकुश मुनेश्वर, व ईतर मान्यवर उपस्थित होते