
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकली असून, महिलांपुढे आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक संकट निर्माण झाले आहे. उत्पन्न वाढत नसल्याने महिलांना एकामागून एक कर्जे घ्यावी लागत असून, त्यांचे आरोग्य आणि घरगुती वातावरण यावर गंभीर परिणाम होत आहे. काही कुटुंबांनी कर्जबाजारीपणामुळे अडचणीत अडकले आहेत.
तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्या किराणा, साड्यांचा व्यवसाय, शेतीपूरक कामे आणि घरखर्चासाठी महिलांना कर्जपुरवठा करत आहेत. मात्र कर्जफेडीचा तगादा आणि एजंटांच्या वसुलीचा दबाव वाढल्याने अनेक महिलांच्या घरांमध्ये वाद, मारहाणीचे प्रसंग वाढले असून, मुलांचे शिक्षणही बाधित झाले आहे. पैसे वसुलीची एजंटांवरही टार्गेटचा ताण असतो त्यामुळे या एजंटकडून वसुली करिता तगादा लावून वसुली केली जाते .या बाबीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मायक्रो फायनान्स बचतीच्या नावाखाली महिलांना आर्थिक गुलामगिरीकडे नेत असल्याची चिंतेची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला आणि शेतमजूर वर्गाला या फायनान्स कंपन्या लुटत आहेत.
सोप्या अटीवर कर्ज मिळते, व्याजदार अधिक
ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे झपाट्याने पसरत असून गोरगरीब नागरिक त्यात अडकत आहेत. अल्प रकमेचे कर्ज सोप्या अटींवर मिळते. परंतु त्यावरील व्याजदर अधिक असतो.
स्थानिक पातळीवर राजेगाराच्या संधी कमी असल्याने लोकांना जगण्यासाठी किंवा किरकोळ व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मात्र उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत नसल्याने हप्ते फेडणे कठीण होते आणि कर्जाचा बोजा वाढत जातो. काही वेळा वसुलीच्या दबावामुळे मानसिक तणाव निर्माण होवून कौटुंबिक अडचणीही वाढतात. यामध्ये सर्वाधिक त्रास महिला व शेतमजुरांना होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभियांने लक्ष देण्याची गरज आहे.
