
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरध सावरखेडा रोडवर झालेल्या घटनेत दोन मोटर सायकल समोरासमोर धडकून दोन जण जागी ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना 19 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.अपघात मृत्यू पावलेले रोशन अंबादास बावणे वय २४ वर्ष रा.सावरखेडा तर नितीन कवडू कुडमथे वय २८ वर्ष रा.सावरखेडा हे दोघे जागीच ठार झाले तर
सविस्तर वृत्त असे की सावरखेडा येथील नितीन कुडमथे हा सायंकाळी एम एच २९ बी एच ९५४८ या क्रमांकाच्या दुचाकीने सावरखेडा वरून वरध कडे जात होता तर रोशन बावणे एम एच ३४ ए यु १८९६ या क्रमांकाच्या दुचाकीने वरध कडून सावरखेड्या कडे येत होता दरम्यान या दुचाकीची वरध गावाजवळ समोरासमोर धडकल्या असून या धडकेत नितीन कुडमथे व रोशन बावणे दोन्ही दुचाकी चालक जागीच ठार झाले तर दुचाकी वर मागे बसणारे गंभीररित्या जखमी झाले असून या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच वरध बीटचे अमलदार आकाश कोदुषे, निरंजन खिरटकर ,चालक अमित किंनाके घटनास्थळी पोहचले त्यानंतर अपघात स्थळचा पंचनामा करून अपघातात जखमींना उपचाराकरिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
