यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विदर्भवादी ” विदर्भ सेवक ” निघाले दिल्ली सरकारच्या भेटीला जंतर मंतर वर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी…..!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ७ एप्रिल ला दिल्ली येथे जंतर मंतर हल्ला बोल आंदोलन करण्यासाठी हजारो विदर्भवादी “‘ विदर्भ सेवक “‘ मा.वामनराव चटप साहेब, रंजना मामर्डे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली रवाना झाले आहेया आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विदर्भवादी सहभागी होणार आहेत आज घाटंजी तालुक्यातील चौळेचाळीस “‘विदर्भ सेवक “‘ यांची टिम विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा अध्यक्ष मा कृष्णा भोंगाडे,मा.मधुसुदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी वर्धा रेल्वे वरुन दिल्ली कडे रवाना केली आहे

दिनांक पांच आणि सहा एप्रिल ला गोंडवाना एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेस उर्वरित “‘ विदर्भ सेवक “‘ यवतमाळ जिल्ह्यातुन राळेगाव, बाभुळगाव, आर्णी, वणी,पुसद, झरीजामनी यवतमाळ मधिल विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्ली ला पोहचत आहेदिल्ली येथे जंतर मंतर वर “‘विदर्भाचे महाआंदोलन”‘ विदर्भाच्या मागणीसाठी होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी मा कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष मा गोविंद चव्हाण मा अशोकराव कपिले मा दिवाकर भोयर ॲड अजय चमेडीया मा.अरुण जोग श्रीधर ढवस नितीन ठाकरे यांनी रेल्वे तिकीट बुकिंग करून देण्यासाठी प्रयत्न केले आहे