


सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक २७ डिसेंबर २०२३ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे नागपूर येथील ” संविधान चौकात” माजी आमदार श्री ऍड वामनराव चटप यांचे नेतृत्वात १) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा् २) विज निर्मिती हि विदर्भात होत असल्याने येथील ग्राहकांना विजेचे दर निम्मे करा. ३) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नी छत्तीसगड राज्यात हमी भावापेक्षा ४० % जास्त भाव देवून धानाची खरेदी, तर मध्यप्रदेशात हमीभावात ३०% जास्त भाव देवून गहू खरेदी ची घोषणा नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सीसीआय व्दारे कापसाचे हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करावी. या व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचे समर्थनार्थ “रस्ता रोको” आंदोलन.
दिनांक २८ डिसेंबर २०२३ ला दुपारी १ वाजता, राष्ट्रीय महामार्गावर बोरी, ता.राळेगाव जि. यवतमाळ येथे करण्यात आले*्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर महिलाचे भजन,बैल ब़डी सह शेतकरी युवक मोठ्या संख्येने सहभागी होते या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, शेतकरी नेते विजय निवल, विदर्भ राज्य आ़दोलन समिती जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोगांडे यांनी केले.
आंदोलनात ईदरचंद बैद, अक्षय महाजन, गोपाल भोयर, पंढरीनाथ बोथले, नविनकूमार तायडे गजानन ठाकरे,ब़़डू येरगुडे, आशिष निम्रड, महेश आवारी, गिरीधर ठमके, घर्षण गमे, जयश्री तामगाडगे, यशोदा खेवले, बबनराव चौधरी,
होमदेव कन्नाके, सुनील बोंडे, भास्कर पाटील, सिध्दार्थ पाटील,श्रीधर ढवस, चंद्रशेखर देशमुख,पवन गमे गजानन कोल्हे, आशिष झोटींग, निलेश डवरे आशाताईं भोयर, अंजना पारखी,शिवा गमे वैशाली खरवडे वेनूबाई महाजन यांच्या सह शेतकरी युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते राष्ट्रीय महामार्ग 45 मीनिट रोखुन धरला शेवटी पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन रस्ता मोकळा करण्यात आला.
