
प्रतिनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी
वर्षातील पावसाळा हा दीर्घकाळ चालला त्यामुळे थंडीची चाहूल म्हणावी तशी उशिरा सुरू झाली पण काही दिवसानी दत्त जयंती येऊन ठेपली आहे त्या अनुषंगाने प्रचंड थंडीची जाण होत असून नक्कीच याचा परिणाम आरोग्याशी निगडित आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे जरुरी बनली आहे.
अशा कडाक्याच्या थंडीत प्रत्येकानेच आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन डॉ. व्ही, डी पांडे यांनी सर्वसामान्यांना केले आहे. त्यांनी सांगितले की बदलत्या वातावरणामुळे विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा फार लवकर परिणाम होतो. त्यामध्ये अनेक व्याधी सर्दी खोकला ताप दमा पोटदुखी इत्यादी आजार आहेत. वयोवृद्ध लोकांमध्ये तर अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. अर्थातच उठ बैस करताना टोंगळ्यांचा त्रास उद्भभवतो हातपाय दुखणे पाठीत दुखणे थंडीमुळे वात दुखी अत्यंत लवकर शरीरामध्ये प्रवेश करतो. दमा असलेल्या रुग्णांचा एकदम श्वासोच्छ्वास घेताना अडथळा येतो.
अशा प्रकारचे लक्षणे दिसतात यापासून बचाव करण्यासाठी थंड व आंबट पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे विशेष करून या काळात फ्रीजमधील पाण्याचा वापर शरीरास अत्यंत अपायकारक असून फ्रीजमधील पाणी पिणे टाळले पाहिजे. कारण यामुळे सर्दी, खोकला, होतो. दमा असलेल्या रुग्णांना अशा बाबी अत्यंत घातक आहेत. विशेष करून या बाबीपासून अशा रुग्णांनी दूरच राहिले पाहिजे. तरच उत्तम तसेच वयोवृद्ध लोकांनी वयाच्या हिशोबाने खाण्यामध्ये आणि प्रत्येक बाबींमध्येच संयम ठेवायला हवा. बदलत्या ऋतू नुसार मुलाची व वयोवृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यायला हवी जेवणामध्ये नियमित पालेभाज्या असल्यास उत्तमच विशेष म्हणजे पाणी उकळून पिल्यास ते आरोग्यास उत्तमच तेव्हा या ऋतूमध्ये प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. असे डॉ. व्हि डि पांडे यांनी सांगितले.

