मशिनच्या साह्याने पाणी पुरवठा विहिरीचे काम करून रोजगारावर केला अन्याय, ( बिटरगाव (बु ) येथील नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार देऊन मागितला न्याय

प्रतिनिधी:प्रवीण जोशी
यवतमाळ


गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले रतन नाईक तांडा येथे भीषण पाणी टंचाई असल्यामुळे, ग्रामपंचायत कार्यालय बिटरगाव (बु ) अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर मनरेगा/ रोजगार हमी योजनेअंतर्गत रतन नाईक नगर येथील रोहिदास चव्हाण यांच्या शेतात विहीर मंजूर करण्यात आली होती, या विहिरीचे खोदकाम व बांधकाम मजुरांच्या हाताने व्हावे व मजुरांना रोजगार मिळावा हे शासनाचे धोरण आहे, मनरेगा/ रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेली विहीर मार्च / एप्रिल2020 पासून अर्धवट खोदलेली होती. फेब्रुवारी/मार्च2023 मध्ये उर्वरित राहिलेले खोदकाम करण्याकरिता शासनाकडून परवानगी मिळताच ग्रामपंचायत कार्यालय बिटरगाव (बु ) सरपंच, सचिव,रोजगार सेवक व कंत्राटदार यांनी अतिशय तातडीने विहिरीचे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने जे.सि.बी. व एल.आर.(टू टेन) मशीनच्या साह्याने खोदकाम करून व खोटे मजूर दाखवून खोट्या मास्टर हुन बिल काढण्याच्या तयारीत आहेत, बिटरगाव (बु ) हे ग्रामीण भागातील गाव असल्यामुळे येथे कोणताही रोजगार नसल्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे, मजुरांना शासनाकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्ग उपासमारीने तडफडून मरण्यापेक्षा शहराकडे धाव घेत आहेत, अशातच मनरेगा / रोजगार हमी अंतर्गत शासनाने मजुरांना रोजगाराची संधी दिल्याने मजुरांमध्ये धीरावा निर्माण झाला होता. मात्र कंत्राटदार व अधिकारी यांनी मिली भगत करून आपलेच पोट भरण्यासाठी मशीनच्या साह्याने कामे करून व खोटे मजूर दाखवून रोस्टरच्या माध्यमातून बिल काढत आहेत.मजूर वर्गावर होत असलेल्या अन्यायामुळे, मजूर वर्ग हातबल झाला आहे.सदर विहिरीचे खोदकाम स्थानिक मजुरांच्या मार्फत करावयास पाहिजे होते.परंतु सदर खोदकाम मशीनद्वारे करून मजुरांचा रोजगार हिरावून मजुरांवर अन्याय केला आहे. तसेच सदर विहिरीच्या बांधकामासाठी अल्प प्रमाणात गज, सिमेंट, गीट्टी, व अतिशय स्वस्त दराची माती मिश्रित रेती वापरून विहिरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे, व बांधकाम थातूर-मतूर पद्धतीचे झाले आहे, म्हणून बिटरगाव (बु ) ग्रामपंचायत येथील काही सदस्य व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना विहीरीच्या कामासंदर्भात तक्रार देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी व मजूरांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.