

प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
बुद्धीची देवता आणि लहान चिमुकल्यांचा बाप्पा अशी ओळख गजानन श्री गणेशाची आहे आणि ते प्रत्येकाचे आराध्य दैवत. गणरायाची स्थापना शहरात अनेक मंडळांनी केली आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाच व चैतन्याचे व जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाच्या आगमनाची दि 19 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळपासूनच भक्तामध्ये भक्तीमय धामधुम सुरू होती.
आपल्या श्री गणेशाच्या आगमनाचे जंगी स्वागत करण्यासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून स्थापनेपूर्वी शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाचे जल्लोशात आणि भक्तीभावाने तरुणांच्या व लहान चिमुकल्यांनी स्थापन केलेल्या मंडळांनी स्वागत केले.
पुढचे दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळाकडून कडून मुर्ती स्थापनेच्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम गणेश मंडळा समोर होणार असून यातून नक्कीच समाज प्रबोधन होईल तसेच आरतीच्या ताला सुरामुळे सभोवतालचे वातावरण भक्तीमय व अपार श्रध्देत नाहून निघणार आहे.
जुने बस स्थानक परिसर व स्टेट बँकेच्या परिसरात अनेक गाव खेड्यातील तरुणांनी गणरायाला लागणारे पूजेचे साहित्य विक्रीसाठी आणले होते त्यामुळे बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली आणि पालकासोबत बालगोपालांनी सुद्धा हार,आणि इतर सजावटीच्या साहित्यासाठी आपल्या पालकाकडे हट्ट धरल्याचे बघायला मिळाले आनंदाचे वातावरण होते शिवाय बाजारात मोठया साधारण व लहान श्री गणरायाच्या मुर्तीची खरेदी करतांना गणेशभक्तांची गर्दी उसळली होती तर मंडपवाले ,मुर्तीकार व संबंधीत इतर व्यवसायीकांच्या धंदयात मोठी वाढ झाली असेल १० दिवसाच्या गणरायाच्या मुक्कामात सार्वजनिक गणेश मंडळाकडून विविध सामाजीक उपक्रमासह सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी ढाणकी करांना ऐकावयास व पाहण्यास मिळणार आहे.
गणरायाचे आगमण पहिल्या दिवशी अगदी थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहराच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढत जल्लोशात भक्ताकडून श्रध्दा पूर्वक जंगी स्वागत होताना बघायला मिळाले
पोलीसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात,आगामी काळात गणेशउत्सव स्थापनेपासून पुढील १० दिवस गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.काही गुन्हेगारावर पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर जाण्याच्या नोटीसा बजावल्या तर अनेक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशभक्तांना आरती व इतर सांस्कृतीक कार्यक्रमाला भयमुक्त वातारणात बाहेर पडूण हजेरी लावता यावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.ठाणेदार सुजाता बन्सोड,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे हे शहरातील हालचालीवर बारकाईचे लक्ष ठेवीत आहेत.
