आज दिनांक 21/जुलै 2023रोजी उमरखेड तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने प्राथमिक शाळा बंद
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
मुख्याध्यापक /प्राचार्य ,पालकवर्ग
आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की उमरखेड तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने उमरखेड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक सर्व शाळा आणि महाविद्यालये आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार बंद राहतील कोणताही विद्यार्थी शाळेमध्ये/महाविद्यालयात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
टीप -इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा शासकीय वाणिज्य परीक्षा जीसीसी टाईप या वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील.
श्री आनंद देऊळगावकर
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय उमरखेड
