
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
भारतामध्ये अनेक दशकापूर्वी तंत्र विज्ञान यात सुधारणा झाली या विज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्यंत जबाबदारीची व सुसंवादाची संपर्काची अनेक माध्यम आली त्यापैकी एक काही वर्षापूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली आकाशवाणी.उत्तम व दर्जेदार माध्यम होते तसेच या बाबीचा संपूर्ण भारतभर विस्तार झाला जीवनातील हे माध्यम एक अंगीकृत घटक बनले भारत देश हा विस्ताराने मोठा आहे तत्कालीन काळात निरक्षरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते आणि देश प्रगतीच्या व जगाच्या पाठीवरील एक विकसनशील देश अशा स्वरूपाची परिस्थिती होती जनसामान्या पर्यंत कोणत्याही प्रकारची वृत्तपत्रासारखी मुद्रित माध्यमे कमी पडत होती. त्यावेळी सुशिक्षित वर्गाचा टक्का हा नगण्य होता त्यामुळे जनतेला वर्तमानपत्र पोहोचत जरी असली तरी ते वाचता येत नसल्या कारणाने आजूबाजूच्या घडामोडीची माहिती करण्यास अवघड जात होते. लिहिता वाचता येत नाही पण ज्ञानेन्द्रिय असलेल्या कानाने श्रवण करू शकतात अशा व्यक्तींना आकाशवाणी हे माध्यम दर्जेदारपणे काम करत राहिले
ज्या काळी दळणवळणाची व्यवस्था सुद्धा फारशी दर्जेदार नव्हती त्यामुळे परिसरात आजूबाजूला काय घडते हे सर्वसामान्या पर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम होते. याचे ज्ञान मार्कोना झाले असावे म्हणून आकाशवाणी जन्माला आली असावी. आकाशवाणीच्या ध्वनी लहरीमुळे माणसाला आपले शब्द लाखो हजारो किलोमीटर असलेल्या ठिकाणी पोहोचवण्यास मदत झाली भारत देश विविध धर्मांचा अनेक भाषेचा शांतता प्रिय देश जगाला ज्ञात आहे. भारत देशांनी १५ घटना दत्तभाषा दिल्या व आकाशवाणी जे शाळेमध्ये कधी गेले नाही अशिक्षित आहे यांना सुद्धा श्रोते म्हणून आपलंसं केलं प्रत्येक घटकाला अनुसरून आवडीनुसार कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले सकाळी बातम्या लगेच देशभक्तीपर गीत आणि मग भक्तिमय गाण्याचा आस्वाद तर युवक मित्रांसाठी चा कार्यक्रम युववानी व रसिक श्रोत्यांसाठी खास कार्यक्रम “आपली आवड” प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा कानोसा घेऊन आकाशवाणीने आपले श्रोते मंडळी टिकवली व ती वाढवली सुद्धा आकाशवाणीच्या प्रसारमाध्यमांमध्ये अनेक कार्यक्रमांचे विविध पैलू असल्यामुळे आकाशवाणीच्या भाषेमध्ये वेगळेपणाचा बदल काळानुसार केला हे विशेष
समाजातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचे उत्तम साधन आकाशवाणी ठरली संसद समीक्षा, समालोचन, सामायिकी, रूपक, नाटक, श्रुतिका व माहितीसाठी सैनिकांसाठी व भारत हा खेड्यात वसलेला देश असल्यामुळे जनतेसाठी खास कार्यक्रम आयोजित केल्या जात असे सर्वसामान्यांना ज्या घडामोडी लक्षात याव्या म्हणून आकाशवाणी ही स्थानिक भाषेचा वापर करते कारण मूळ मातृभाषा हे जनसंपर्काचे एक हृदयस्पर्शी व उत्तम मार्ग आहे अशा स्थानिक भाषेचा उपयोग आयोजन आकाशवाणी या ध्वनी लहरी प्रेरित जनसंपर्क माध्यमा ंशी केला जातो. मातृभाषा ही माणसाच्या पूर्व काळापासून व स्वतःच्या कल्पना कोण्यातरी बाबीवरून बंदिस्त आहेत एखाद्या व्यक्तीचा एकमेकांशी संवाद होतो तो मातृभाषेमुळेच आणि सर्व प्रकारचे वैचारिक व्यासंग ज्ञान हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत हे मातृभाषेतच बिंबवल्या जाते हे आकाशवाणीच्या लक्षात आले असेल म्हणूनच आकाशवाणी न बोलीभाषेला प्राधान्य दिले म्हणून जन्मसामान्यात आकाशवाणी लोकप्रिय ठरली
ग्रामीण भागामध्ये प्रसारण बरोबर होत नसल्यामुळे रेडिओला विशेष एक फूटभर काडी असायची त्याला “एरियल’ असं नाव रूढ झाले होते आवाज सुस्पष्ट यावा व ध्वनी योग्य रीतीने येऊन अडथळा व अडचण मुक्त प्रसारणासाठी याचा उपयोग होत असे विद्युत प्रवाहावर चालणारी यंत्रे होती विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर हे यंत्र बंद होत असत यावर पर्याय म्हणून सुधारित पणाची निर्मिती झाली व सेलवर चालणाऱ्या रेडिओ ची निर्मिती झाली काळानुरूप आकाशवाणीने व श्रोत्यांनी सुद्धा एकमेकांतील दुरावा कमी होण्यासाठी बदल स्वीकारून विश्वास कायम ठेवला सर्व श्रवणाभिमुख भाषेचा जपत अनेक विविध विषयाला अनुसरून जपणारी आकाशवाणी ने आता आधुनिकतेची कास धरली असली तरी नेहमीची लाडकी व हवीहवीशी आकाशवाणी पासून श्रोतावर्ग मात्र दुरावलेला दिसतो ही शोकांतिका म्हणावी लागेल ग्रामीण भागात क्रिकेट हा खेळ तेवढा फारसा लोकप्रिय नव्हता तरीपण काही मोजकी मंडळी ही ऐकण्यासाठी आकाशवाणीचाच वापर करत त्याकाळी सर्वांकडे दूरचित्रवाणी उपलब्ध नव्हती त्यामुळे क्रिकेट रसिकांची मनोरंजन सेवा मोठ्या प्रमाणात आकाशवाणीने केली बघता बघता प्रचंड मोठ्या प्रमाणात आधुनिकतेता आली.४जी तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झाले त्याला अनुसरून आकाशवाणीने तो बदल स्वीकारला श्रोते दुरावल्या जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली पण श्रोत्यांनी मात्र आकाशवाणी कडे पाठ फिरवल्याचे दिसते ४जी मोबाईल मध्ये सुधारित ॲप आल्यामुळे देशातील कोणत्याही आकाशवाणीचे केंद्र श्रोतांना ऐकता येते विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्र आहे . नंतर आकाशवाणी यवतमाळ निर्मिती झाल्यानंतर हॉटेल, पानटपऱ्या शेतकरी रात्री पाणी देताना तर हमखास एक मित्र म्हणून आकाशवाणी यवतमाळ सोबत असायची त्यात पत्र पुष्पांजली, फोन फर्माईश इत्यादी कार्यक्रमाचे प्रसारण असायचे आधुनिकतेच्या काळात आकाशवाणीने श्रोत्यांची साथ सोडली नसली तरी सर्वसामान्याना मात्र आकाशवाणीचा विसर पडलेला दिसतो.
