
सहसंपादक: रामभाऊ भोयर
सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी ‘सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय पातळीवर पोहोचण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी नुकतेच एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंह दुहन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्ष रणधीर सिंह दुहन यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडागुणांचे कौतुक करत सांगितले की, “खेळामुळे आत्मविश्वास वाढतो आणि शारीरिक व मानसिक विकास साधतो.”
प्रमाणपत्र प्राप्त करणारे विद्यार्थी – तुषार केराम, तुकाराम टेकाम, रेहान पठाण, कार्तिक बत्रा, चेतन ढोकळे, पुष्कर कायचाडे, अमर पवार, शिवम पेंडोर, प्रणय आडे, रोहित सीडाम आणि नमन कदम – यांनी कठोर परिश्रम, टीमवर्क आणि शिस्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन सीबीएसई), क्रीडा शिक्षक जितेंद्र यादव, राकेश दुहन तसेच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे विद्यार्थी आपले नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.
