नारीशक्ती दुत अँप मधून तालुका निवडीच्या पर्यायातून राळेगाव तालुका गायब, लाडकी योजनेचा तालुक्याविना अर्ज कसा भरायचा : जनतेत संभ्रम

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून दरमहिन्याला 1500 रुपये बहिणीच्या खात्यात देणार असून राळेगाव तालुक्यातील बहिणीला अर्ज करताना विचार पडला आहे कि तालुका कोणता निवडू? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दुत अँप तयार केले असून अँप मध्ये काही दुरुस्त्या करीत असल्यामुळे आज पर्यंत हे अँप एर्रर दाखवत होते परंतु जेव्हा ते अँप सुरु झाले तेव्हा परत एक चूक झाल्याचे लोकांना समजले. या अँप मध्ये योजनेचा अर्ज भरताना जिल्हा, तालुका, गाव निवड करायचे असून तालुक्याच्या पर्यायातून राळेगाव तालुकाच गायब झाल्याचे लक्षात आले त्यामुळे नागरिकांत तारांबळ उडाली आहे. लाडकी योजनेचा अर्ज नारीशक्ती दुत या अँप द्वारे ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध केले असून या अँप मध्ये ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्या निवड केल्या नंतर तालुका निवडायचा असतो यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके असून या अँप मध्ये 15 तालुक्याचा समावेश केला असून राळेगाव तालुका तालुक्याच्या लिस्ट मधून वगळण्यात आला आहे यामुळे राळेगाव तालुक्यातील जनतेला संभ्रम पडला आहे कि तालुका कोणता टाकायचा आणि कसा भरायचा कारण तालुका निवड केल्या शिवाय अर्ज पूर्ण होत नसून सबमिट होण्यास अडचण होताना दिसत आहे. या अँप मध्ये तुरंत दुरुस्ती करून राळेगाव तालुका ऍड करण्यात यावा व अँप परत योग्य तपासणी करून सक्रिय करण्यात यावे अशी तालुक्यातील जनतेनी मागणी केली आहे.