वडकी पो.स्टे.अंतर्गत सिंगलदीप फाट्याजवळ सापडले अनोळखी ईसमाचे प्रेत , ओळख पटविण्याचे पो.स्टे.ने केले आवाहन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

               

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर हैद्राबाद रोडला असलेल्या सिंगलदीप जवळ गोपाल खुंगार यांच्या शेताच्या बांधावर एका अनोळखी ईसमाचे प्रेत पडून असल्याची माहिती दिनांक 7/12/2023 रोजी डायल 112 वरून मिळाली असता सदर मृतक हे वयोवृद्ध असून त्यांचा मृत्यू थंडीने गारठून झाल्याचा अंदाज आहे. सदर मृतकाचे वय अंदाजे 65 वर्ष वयाचे असून त्याच्या अंगात जांभळ्या रंगाचे स्वेटर असून त्या स्वेटरवर निळ्या रंगाचे नक्षीकाम केलेले आहे.व काळपट रंगाची टी.शर्ट घातली असून ज्यावर 2020असे लिहिले असून काळपट रंगाचे लोअर घातलेला उताण्या स्थितीत आढळला असून त्यांना जवळून पाहिले असता कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे दिसून आले त्यांच्या छातीवर उजव्या बाजूला तीळ असून अशा प्रकारचे कोणाचेही नातेवाईक मिसिंग असल्यास वडकी पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय महल्ले यांनी केले असून स.पो.नि.श्री विजय महल्ले 9922140643 पो.उ. निरीक्षक श्री विजय जाधव 9604021090 पो.हे.काॅ.2068 रमेश मेश्राम 7775061626 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.