हिरवेगार पैनगंगा अभयारण्य पडले ओसाड
( पैनगंगा अभयारण्यातुन सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटक जात असताना रेलचेल कमी)

प्रतिनिधि: शेख रमजान बिटरगाव ( बु )


उमरखेड तालुक्यातील ग्रामीण बंदी भागात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. हा धबधबा प्राचीन काळातला असल्याने सहस्रकुंड धबधबा वारंवार पाहण्याची आवड पर्यटकांना होत असते. निसर्गमय वातावरण व सोबतीला पैनगंगा अभयारण्याची जोड असल्याने ह्या धबधब्याची चर्चा दूर – दूर पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत शहरी व ग्रामीण पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते. सहस्रकुंड पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांना मार्गे बिटरगांव ( बु ), गणेश वाडी, पिंपळगाव, जेवली, मुरली ही गावे ओलांडून पर्यटन स्थळावर जावे लागते. या गावादरम्यान संपूर्ण रस्ता पैनगंगा अभयारण्य ( वन्यजीव ) अभयारण्य असल्याने हिरव्या निसर्गमय सौंदर्याने पर्यटकांचे मन अगदी आनंदी होत होते. विविध जातीचे हिरवेगार छोटे-मोठे वृक्ष पर्यटकांना पाहण्यास मिळतात. त्यामुळे कधी न बघण्यासारखे वृक्ष व अनेक निसर्ग देखावे पाहण्यास मिळत असल्या कारणाने पर्यटकांना खूप आनंदी होताना पाहण्यास मिळत होते. हल्ली मागील काही दिवसापासून पर्यटकांची गर्दी खूपच कमी झाली आहे. हिरवा शालू पांघरलेले जंगल आता विद्रुप दिसत आहे. ज्यामुळे पर्यटकांनाही पहिल्यासारखा आनंद मिळत नसल्याने पर्यटकांची गर्दी हळूहळू कमी होताना दिसत आहे. म्हणून सहस्त्रकुंड धबधब्याला हिरव्यागार पैनगंगा अभयारण्याची जोड असणे गरजेचे आहे अशी चर्चा बंदी भागातील बहुतांश नागरिक करताना दिसत आहे.