
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 05 डिसेंबर रोजी बाभुळगाव तालुक्यात येरणगाव येथे जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य निर्मलाताई झोड, स्पेक्ट्रम फाउंडेशन चे पियु व्यवस्थापक नरेश बाजरे,यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रक्षेत्र अधिकारी लक्ष्मण येडस्कार यांनी केले. त्यानंतर पि यु व्यवस्थापक नरेश बाजरे यांनी शेतकऱ्यांना जीवनासाठी माती अत्यावश्यक का आहे व ती आपल्याला अन्न, वस्त्र,निवारा आणि औषधी यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनाचा स्त्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे, शिवाय माती ही वेगवेगळ्या प्रमाणात खनिज, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनवलेल असते. जीवनासाठी ते महत्त्वाचे आहे,माती हि वनस्पती वाढवण्यासाठी एक माध्यम आहे.अनेक कीटक आणि इतर जीवांचे घर आहे व तसेच माती कशा पद्धतीने वाचवता येईल हे सांगीतले. जंगलतोडीवर बंदी घालावी वृक्ष लागवडीवर विशेष भर द्यावा बांधकाम आणि खाणकामात मातीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे शेताची नागरणी उत्तराच्या विरोधात करावी माती प्रदूषण थांबवण्यासाठी आपण काय केले पाहिजे प्लास्टिकचा वापर टाळावा, बायोचार चा वापर व ज्या शेतात आपण कार्यक्रम ठेवला आहे त्या रीजेनरेटिव अग्रिकल्चर डेमो प्लॉट चे वैशिष्ट इत्यादि बद्दल माहिती दिली.तसेच या कार्यक्रमा मध्ये डेमो फार्मर श्री बबनराव वाणखडे यांचा शाल श्रीफळ व झाड देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता स्पेक्ट्रम फाउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी शुभम डफळे, वैभव मेघळ, हितेश भोयर,नागसेन सुटे, आनंद मांढरे,संदीप जगताप,वैभव इजपाडे,अंकुश न्हाने,कृषी सखी प्रियांका होटे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा करिता शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
