
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अमित भोईटे यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या हप्त्याच्या रकमा परत मागण्यात येत आहे त्यात इन्कम टॅक्स रिटर्न अशी कारणे दिले आहेत शासनाने स्वतःहून ते दोन हजार रुपये अनुदान दिले आहेत आता विविध कारण सांगून ते शासन परत घेत आहे गरीब शेतकऱ्यांना एकीकडे नोटीस बजावल्या जात आहेत तर दुसरीकडे उद्योगपतींना हजारो कोटीची कर्जमाफी दिली जात आहेत शासनाला उद्योगपती जवळचे आहेत पण केंद्र सरकारला जगाचा पोशिंदा का आठवला नाही असा भेदभाव का सोबतच लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे लोड शेडिंग बंद करून शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीज द्यावी तसेच येलो मोजाक सारख्या रोगाने आक्रमण करून शेतकऱ्यांच्या सोयाबीन ची वाट लावली आहेत तरी शासन पंचनामे करीत नाहीत आणि पीक विमा ही मिळत नाही सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून उत्पादन नगण्य आहे तेव्हा शेतकऱ्यांना पिक विमा व 25 हजार रुपये सरसकट एकरी अनुदान द्यावे व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडण्याची मोहीम सुरू केली आहे मागील वर्षी सुद्धा कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे कापूस पिकावर शेतकऱ्यांचा होणारा खर्च पाहता आमची मागणी आहे की कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा सोबतच कृषी अवजारावर व कृषी साहित्यवर मिळणारी सबसिडी त्वरित देण्यात यावी आदि मागन्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देतांना काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे ,शहराध्यक्ष प्रदीप ठुने ,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुष्पा कोपरकर ,शहराध्यक्ष ज्योत्स्ना राऊत ,खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले,वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे,नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, कृष्णराव राऊळकर,अशोक पिंपरे,तातेश्वर पिसे,मंगेश राऊत, गजानन पाल,विनोद नरड,गजानन महाजण ,विनायक नगराळे,भानुदास राऊत, प्रभाकर राऊत,अंकुश मुनेश्वर, मनीष गांधी,अंकित कटारिया ,अफसर सैय्यद,राजेंद्र नागतुरे,नरेंद्र जयसिंगकार,पुरुषोत्तम कोपरकर कवडू जूनघरे ,जया रागेनवार, कवडू येपारी,निलेश हिवरकर दिलीप उरकुडे,सुनील भामकर,आदी शेतकरी उपस्थित होते.
