अवैध रेती वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त
मंडळ अधिकाऱ्यांचा रेती तस्कराना दणका

सहसंपादक : रामभाऊ भोयर

तालुक्यात वर्धा नदीपात्रातून बऱ्याच घाटावरून अवैध रेतीची बेमुसार उपसा होत असून अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या संदर्भात वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध होत असल्याने महसूल विभागाने रेती तस्करी रोखण्यासाठी पायबंद घातला असून आज दिं २१ डिसेंबर २०२३ गुरवारला सकाळी ६:३० वाजता मंडळ अधिकारी महादेव सानप हे मौजा धानोरा रोहणी कडे जात असताना रोहणी धानोरा रोडवरून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई करून जप्त केले आहे.

या पाचही ट्रॅक्टरचे पंचनामे करून पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालय राळेगाव जमा करण्यात आले असून सदरची कारवाई मंडळ अधिकारी महादेव सानप यांनी केली असून सोबत सुनील कुऱ्हे वाहन चालक तहसील कार्यालय व सूरज पारधी वाहन चालक उपविभागीय अधिकारी राळेगाव हे होते.