सहसंपादक : रामभाऊ भोयर
सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका ४४ वर्षीय इस्माने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खेमखुंड शिवारात दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
मृत्तक ज्ञानेश्वर पुरुषोत्तम ढोबळे व ४४ वर्ष राहणार सावरखेडा तालुका राळेगाव अशी आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे ज्ञानेश्वर ढोबळे यांनी कर्जबाजारीपणामुळे व होणाऱ्या सततच्या नापीके मुळे व यावर्षी सुद्धा शेतात लावलेला खर्च निघणे कठीण झाले असल्याने तो नेहमी कर्जबाजरी पणाच्या विवंचनेत राहत असे शेवटी ढोबळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेत शेजारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे . या घटनेची माहिती गावकऱ्यांनी बीट जमादार रमेश आत्राम व पोलीस अंमलदार आकाश कडूशे यांना दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून या घटनेचा अधिक्तपास वडकी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
