
सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बंदर येथे दिं.२४ सप्टेंबर २०२५ आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी राळेगाव सुधीर पाटील व मा. तहसिलदार अमित भोईटे यांचे मार्गदर्शनात विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले असून या शिबिराला गावातील सरपंच,पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.
तालुक्यापासून ३० किलोमिटर अंतरावर असलेल्या वरध मंडळातील लोकांची विविध विभागातील योजनांची कामे व्हावी तसेच येथील लोकांना कागदपत्रे वेळीच उपलब्ध व्हावे या हेतूने वरध मंडळातील ९० टक्के आदिवासी
बंजारा विमुक्त भटक्या जमाती ,आदीम जमातीव इतर जमाती आदी १७ गावातील नागरिकांकरिता छ्त्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र नानक्रीमिलेयर आधार कार्ड अपडेट रेशन कार्ड सातबारा फेरफार आदी दाखल्याचे वाटप करण्यात आले तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असून या शिबिरामध्ये जवळपास ४०० ते ५०० लोकांनी उस्फूर्त सहभाग नोदविला .
या शिबिराला महसूल विभागाचे ग्रामहसुल अधिकारी,पुरवठा विभाग,निवडणूक,विभाग,संजय गांधीविभाग,.पंचायत विभागाचे ग्रामविस्तार अधिकारी, आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स,आधार चालक,सेतु चालक सर्वांनी आपले विभागाचे स्टॉल लावले होते.
शिबीर यशस्वी करण्याकरिता मंडळाचे मंडळ अधिकारी अनिल कणसे, बंदर येथील ग्राम महसूल अधिकारी काजल किनाके, गजानन जयस्वाल मंडळातील ग्राम महसूल राजेद्र तुमराम, धर्यशिल बोंदांडे, ,शालिक कनाके ,राहुल उईके,नितीन जुमनाके, तसेच सरपंच इंदल राठोड, रंजितभाऊ कोरडे लोणी, ग्रामविकास अधिकारी ,ग्रामरोजगार,ऑफरेटर यांनी विशेष परिश्रम घेतले.
