
वरोरा –
२९ जानेवारी २०२३ ला मालवण (सिंधुदुर्ग)येथे होणाऱ्या कला व सांस्कृतिक संचालनालय,
गोवा सरकार तथा कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र तर्फे कवी नीरज आत्राम वरोरा जि. चंद्रपूर यांना त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक कार्यासाठी ” राष्ट्रीय शैक्षणिक सन्मान सेवा पुरस्कार ” तर कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कलाशिक्षक परमानंद तिराणिक आनंदवन,वरोरा यांना ” राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कारासाठी ” प्रा.डाॕ.बी.एन खरात अध्यक्ष -निवड समिती, कला सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार तथा कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधूदूर्ग महाराष्ट्र यांनी वरील पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सदर पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,”स्वराज्य रक्षक संभाजी ” मालिका फेम,मा.अनिल गवस व गोवा राज्याचे कला , क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण विकास मंत्री मा.नाम.गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते मालवण येथे कलानाट्य् उत्सवामधे प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी नीरज आत्राम व परमानंद तिराणिक यांची निवड झाल्याबद्दल अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी , शिक्षक मंचचे सर्व पदाधिकारी , साहित्यिक संघटना पदाधिकारी, सर्व सारस्वत, आप्तस्ट,आदिवासी सामाजिक संघटना,अधिकारी,डाॕक्टर असोशिएशनचे सर्व पदाधिकारी इतर महाविद्यालयीन प्राध्यापक मंडळी व दिव्यांग क्षेत्रातील अनेक संघटनांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यारी यांचे कडून अभिनंदनाचे वर्षा होत आहे.
