परतीच्या पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

प्रतिनिधी:प्रवीण जोशी. ढाणकी

उमरखेड तालुक्यातील ढाणकी मंडळामध्ये गेले दोन तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाट सह पावसाने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले होते मात्र शेतकऱ्यांनी त्यामधून कसे तरी सावरले कापूस पिकाला दहा बारा बोंडे लागले सोयबीन पिक हातात आल्यावर हातातून जाण्याची शक्यता शेतकऱ्यां कडून व्यक्त केली जात आहे कापसाला लागलेली दहा बारा बोंड कसे बसे हातात येईल म्हटलं तर तेही बोंडे सडून जात असल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यकर्ते यांना तर चक्क शेतकऱ्यांचा विसर च पडल्याचे दिसते जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ची मदत येऊन महीना उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पर्यंत दमडी सुध्दा जमा झाली नाही याबाबत एकही राजकीय पदाधिकारी आवाज उचलतांना दिसत नाही संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे कि नाही असा सुर शेतकऱ्या मधून ऐकायला मिळत आहे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सुध्दा अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे