
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलात दिनांक 30/11/2022 होऊ घातलेल्या मैदानी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथील विद्यार्थी खेळाडूंनी प्रवेश नोंदविला होता.त्यापैकी लांब उडीमध्ये गणेश वाणी,वय 19वर्षे यांनी तालुका पटकावला असून धाव स्पर्धेत कुणाल पत्रकार,19 वर्षे वयोगट, कृतिका खडसे,17 वर्षे वयोगट, भुमिका बोभाटे,14 वर्षे वयोगट,यश भगत 14 वर्षे वयोगट यांनी तालुक्यावर बाजी मारून जिल्ह्यासाठी आपला प्रवेश निश्चित केला असून यवतमाळ येथे दिनांक 8/12/2022 रोजी संपन्न होणाऱ्या खेळात राळेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून विजयी खेळाडूंना लखाजी महाराज विद्यालयाचे शा.शिक्षक तथा मुख्य कोच मोहन बोरकर, सहायक कोच शुभम मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले. सोबतच जेष्ठ शिक्षक तथा कब्बड्डीचे प्रशिक्षक श्रावनसिंग वडते यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले असून या विजयी खेळाडूचे विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.त्यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर,दिगांबर बातुलवार,रंजय चौधरी, राजेश भोयर,मोहन आत्राम, विशाल मस्के, कुंदा काळे, वंदना वाढोणकर,स्वाती नैताम, वैशाली सातारकर, दिपाली कोल्हे, अश्विनी तिजारे,रिचिता रोहनकर,वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते.वरील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
