जागतिक आदिवासी दिवसा निमित्त मोहदा येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

*

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा, केळापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मौजे मोहदा या ठिकाणी दी ९ आगस्ट २०२४ शुक्रवार रोजी ११वाजता जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधुन परिसरातील सर्व गोंड गोवारी बांधवांनी जागतीक आदिवासी दिवस महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे,सोबतच सामाजिक व सांस्कृतीक विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.प्रथम गावातून रैली काढण्यात येणार असून रैली मध्ये गोंड गोवारी जमातीचे सांस्कृतिक प्रतीक ढाल,डफ,पाउल बासरीसह निघणार आहे त्यानंतर नाथांनी इंग्लिश स्कूल येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता मा मनोहर शहारे उद्घाटक म्हणून समाजसेविका सुवर्णा ताई नागोसे ,
प्रमुख मार्गदर्शक रामदास नेवारे राज्य सचिव आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र.उपोष्णकर्ता सचिन चचाने का.संयोजक आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती.प्रवीण नागोसे अभ्यासगट आदिवासी गोंड गोवारी जमात. प्रमुख अतिथी विनोद दुधकोहळे राळेगाव , नानाभाऊ भोयर बाभुळगाव , प्रवीण बोटरे उपसरपंच परसोडी , गजानन कोहळे उपसरपंच सखी नंदकिशोर नेहारे, काशिनाथ वाघाडे , नानाभाऊ दूधकोहळे,सखी , ज्ञानेश्वर सहारे मोहदा, दिनेश अरतपायरे, आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजक रुपेश सहारे,रवींद्र दूधकोहळे, दिलीप कोहळे , सुरेश सोनवणे , सचिन नेहारे, हनुमान नेहारे मारोती नेहारे ,अमोल कालसर्प ,शंकर परसराम , लक्ष्मण कडाके, सचिन अंबाडारे,ऋषिकेश वगारहांडे ,रोशन राऊत तथा समस्त आदिवासी गोंड गोवारी जमात मोहदा.