
सहसंपादक: रामभाऊ भोयर
बकरी ईदआषाढी एकादशी इत्यादी सण उत्सवाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडकी पोलिसांनी आज दि २८ जून रोजी रोजी पथसंचलन केले. सण व उत्सवाच्या काळातकोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. गावातील शांततेला धक्का पोहोचू नये यासाठी पोलिस खात्याने बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे. तसेच समाजकंटकांना इशारा देण्यासाठी आज बुधवारी रूट मार्च काढण्यात आला. वडकी येथील ठाणेदार विजय महाले यांच्या उपस्थितीत पोलिस ठाणे वडकी येथून पथसंचलन करीत कापड लाईन, मोठा बोगदा, लहान बोगदा, जामा मस्जिद,आठवडी बाजार तसेच गावातील प्रमुख मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्चकरिता १ पोलीस अधिकारी व १४ पोलिस अंमलदार व १२ होमगार्ड उपस्थित होते.
