हेल्थ इज वेल्थ समूहातर्फे विवेकानंद वसतिगृहात कोजागिरी साजरी

प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढाणकी

हेल्थ इज वेल्थ या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या समूहाने स्वामी विवेकानंद वस्तीगृह अर्थातच बोर्डिंग ढाणकी येथे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला रुपेश कोडगिरवार, गजानन जिल्हावार, विवेक प्रतापवार, आनंद येरावार, धीरज कोडगिरवार, गजानन मामीडवार, अनिल येरावार, डॉ नरेश गंधेवार, इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून कोजागिरी पौर्णिमेचे महत्व गजानन चव्हाण यांनी आपल्या योग साधकांना सांगितले.