ढाणकी येथील हेल्थ इज वेल्थ क्लब तर्फे योगा प्रशिक्षण


प्रतिनिधी(प्रवीण जोशी) ,ढाणकी


ढाणकी येथील हेल्थ इज वेल्थ या क्लब ने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून या ठिकाणी अनेकांना अगदी ज्या घडेल त्या व मापक अंतरात दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत जीवनावश्यक बनलेला योगासनाचा प्रकार शिकवण्यात येत असून यामुळे शरीरात असणाऱ्या अनेक व्याधींना रोखण्यास मदत होईल हल्ली धकाधकीच्या जीवनात माणूस अनेक व्याधींनी ग्रासलेला आहे तेव्हा अशा या उपक्रमामुळे नक्कीच निरोगी राहण्यास मदत होईल. वृध्द तर या योगासना कडे वळतच आहेत. शिवाय तरुण सुद्धा योगासने शिकण्याच्या हेतूने प्रेरित होताना दिसत आहेत. तेव्हा योगासनाचे प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास गजानन चव्हाण यांना भेटावे असे आव्हान हेल्थ इज वेल्थ क्लबच्या सदस्यांनी केले आहे.