
निवडणुकीत खोटे आश्र्वसन देऊन सरकार स्थापन केले:- वर्षाताई मोघे
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र सरकारने ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. विधानसभा निवडणुकीत हे मानधन १५०० रूपयांवरून २१०० रूपये करणार असल्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलांच्या मतदानाच्या आशिर्वादावर सत्ता पण आली पण प्रत्यक्षात गेले दोन महिन्याचे मानधनही खात्यात जमा करण्यात सरकारला अपयश आले आहे. आणि आश्वासन २१०० रूपयाचे देऊन प्रत्यक्षात १५०० रूपये मानधनच खात्यात जमा होत असल्याने महिलांची अपेक्षा भंग करण्याचे काम हे सरकार करत आहे. तेव्हा शासनाने थकीत व आश्वासनानुसार २१०० रूपये मानधन त्वरीत महिलांच्या बँक खात्यात टाकुन लवकरात लवकर देण्यात यावे. अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे महीला आघाडी कडून तहसिलदार अमीत भोईटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे यावेळी करण्यात आली. यावेळी विनोद काकडे उप जिल्हा प्रमुख, विजय पाटील तालुका प्रमुख, वर्षाताई मोघे महीला आघाडी तालुका प्रमुख,इमरान पठाण शहर प्रमुख, प्रशांत वारेकर, हेमंत वाभिटकर, देवराव नाखले, शंकर गायधने, वृषभ दरोडे, कृष्णा मडावी अमोल राऊत वीरेंद्र मोघे
पार्वता बाई मुखरे महीला आघाडी शहर प्रमुख
प्रगती कावळे युवती जिल्हा प्रमुख
शीतल सिडाम शालिनी फुस्नाके अनिता कांवटकर उषा हरणे अल्का लोहांडे सह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व महीला उपास्थित होत्या.
निवडणूकीत सरकारने लाडक्या बहिणीला दरमहा १५०० वरुन २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले परंतु आता मात्र तसे होतांना दिसत नाही आहे यावरून असे दिसुन येथे की सरकारने फक्त निवडणूकीसाठी हा जुमला केला होता आणि आता तर अनेक महिलांच्या कागद पत्रात त्रुटी काढून त्यांचे मानधन बंद केले आहे त्यामुळे महिलांची फसवणूक करण्याचे काम सरकार करत आहे जर पुढील महिन्यात लाडक्या बहिणीला २१०० रूपये प्रमाणे मानधन मिळाले नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे महीला आघाडी कडून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.
वर्षाताई मोघे
तालुका अध्यक्ष शिवसेना उध्दव ठाकरे गट महिला आघाडी
