
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील 3 किलो मिटर वर असलेल्या रावेरी येथील विजय दादाजी दुर्गे सुरवाती पासूनच जिद्द आणि चिकाटी असल्याने व अतिशय गरिबीच्या परिस्थितीत परिस्थितीवर मात करून वयाच्या तेराव्या वर्षापासून घरच्या गाई बैल चारून सकाळी दूध राळेगाव येथे घेवून जावून आपले शिक्षणिक जीवन सामोरं नेत परिस्थितीवर मात करण्याचा विक्रम विजय दुर्गे सर यांनी घडविला, दहावा वर्ग नेताजी विद्यालय राळेगाव येथून 76%मार्क घेवून पास झाल्यानंतर 1994 मध्ये डी एड परीक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर गवळी पुसद येथे अधीक्षक म्हणून आश्रम शाळेवर काही दिवस नोकरी केली व त्यानंतर 1995 मध्ये जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत अडणी, केळापूर तालुक्यातील येथे चार वर्षे आपल्या जीवनात शिक्षक म्हणून रुजू झाले आणि चार वर्षे काम केले त्याच काळात करंजी येथील मंडळात उत्कृष्ट कबड्डी प्लेयर म्हणून उदयास पण आला, व आपलं नाव लवकिक केलं, 1998 मध्ये राळेगाव पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटी येते शिक्षक म्हणून रुजू झाले आणि मनाशी अभ्यासाचा ध्यास बाळगून आणि विशेष करून वाचनाची आवड असलेले पुस्तक आकाशाची जडलेले नाते, जयंत नारळीकर यांचे नियमित वाचन करत होते 2008 मध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु समोरचा मोठे स्वप्न मनाशी बाळगून असल्याने, पी एस आय नोकरीला नकार दिला व राज्य सेवा आयोग परीक्षा उतीर्न होवू शकतो तर राज्यसभेतून मोठी पोस्ट मिळावी या उदात्त हेतू मनाशी बाळगून आपले प्रयत्न अखंडित सुरू ठेवले नंतर राळेगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यात आले आणि स्वतः कर्तुत्वान असल्याने राळेगाव येथे पहिल्यांदा सुरू झालेली नगरपंचायत येथे त्यांची पत्नी 2015 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्याच सोबत विविध व्यवसाय स्वतःच्या पेट्रोल पंप फ्लॅट घेणे फ्लॅट विकणे हा व्यवसाय सुरू केला, आणि आपल्या परिवारास सांभाळून घेण्यास खूप मोठा मोलाचे सहकार्य केले एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या यशाचा मानाचा तुरा पुन्हा एकदा मिळविण्यास समर्थ ठरले श्रीमान विजय दादाजी दुर्गे यांच्या या उतुंग कामगिरीला खैरे कुणबी समाज राळेगाव यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
