
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका मुख्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे असून भिंती देखील थुंकीने माखल्या असून प्रसाधनगृहातून दुर्गंधी पसरली असून शासकीय कामा करिता आलेल्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामळे नव्याने आलेले तहसीलदार साहेब याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून केल्या जात आहे.
यापूर्वी येथे असलेल्या अधिकारी यांनी या प्रशासकीय इमारतीत काही दिवसांपासून असलेल्या इमारतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुका मुख्यालय असलेल्या प्रशासनाच्या कारभाराचा गाडा एकाच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतून हाकलला जावा यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या इमारतीत राळेगाव तहसील कार्यालय व त्याच्या विविध शाखा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,अशा पाच ते सहा विभाग या प्रशासकीय इमारतीत कार्यरत आहेत काही विभाग वगळले तर सर्व तालुका प्रशासनाचा कारभार या मध्यवर्ती इमारतीतून चालत असतो अशा परिस्थितीत या इमारतीत दररोज शेकडो नागरिक आपल्या कामासाठी हजेरी लावत असतात अतिशय भव्य असणाऱ्या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काना डोळा होत असल्याचे दिसून येत आहेत इमारतीच्या जिण्याच्या प्रत्येक काण्या कोपऱ्यात कचरा साचलेला आहे तर जिण्याच्या बाजूच्या भिंती खर्रा खाणाऱ्यांच्या थुंकीने माखलेल्या दिसून येत आहेत तसेच कार्यालयात येताच प्रसाधनगृह एवढे घाणीने माकले असून दुर्गंधी पसरली असतांना लघुशंकेसाठी जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देने होय.
या इमारतीत प्रवेश केल्यास प्रसाधनगृहातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी चालत असून येणाऱ्या नागरिकांना नाका तोंडाला रुमाल लावूनच कार्यालयात फिरावे लागते आहे. तसेच
या प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून गुटखा खाणाऱ्यांनी पिचकारी मारून ठेवल्याने जिन्यावरून जाताना मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांना अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार अनुभवावा लागत आहे एखाद्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असताना जिन्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येत नाहीत का येत असेल तर अधिकारी कर्मचारी यांनी इमारतीतील या स्वच्छतेकडे सपशेल दुर्लक्ष केले की काय असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
या प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कामानिमित्त येणारे व्यसनाधीन बेशिस्त नागरिकच नाहीतर येथे कार्यरत असलेले कर्मचारी सुद्धा भिंतीवर थुंकत असल्याची चर्चा येथे येणारे नागरिक करताना दिसत आहे. या इमारतीत जिन्याच्या भिंतीवर थुकू नये जर थुकल्यास थुंकणाऱ्यावर दंड आकारण्यात येईल अशा आशयाचे पोस्टर चिपकविलेले आहेत मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात भिंती पीचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत आतापर्यंत एकही थुंकणाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या सूचनेचे फारसे गांभीर्य गुटखा बहाद्दरांमध्ये दिसून येत नाही तेव्हा नव्याने आलेल्या तहसीलदार साहेब यांनी कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय अशा बेशिस्त नागरिकांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार नसल्याचे सांगितले जाते. तसेच प्रशासकीय इमारतीचा समोर वाहने बेशिस्त पणे उभी असतात याकडे नव्याने आलेल्या तहसीलदार साहेब यांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
सद्यस्थितीत प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून प्रसाधनगृह साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वच्छता मोहिमेनंतर इमारतीत अस्वच्छता पसरवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जावी जेणेकरून इमारत स्वच्छ सुंदर ठेवण्यात प्रशासनाची धमछाक होणार नाही.
