खैरी लोक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक निलंबीत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

लोक विद्यालय खैरी ता. राळेगाव जी. यवतमाळ चे मुख्याध्यापक श्रि. सिद्धार्थ नामदेव खैरे यांच्या वर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.
सदर मुख्याध्यापकाच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने गट शिक्षणा धीकारी पं. समिती राळेगाव तथा अध्यक्ष चौकशी समिती यांच्या चौकशी पथकाने चौकशी करून निष्कर्शा सह चौकशी अहवाल मा.शिक्षणा धिकारी यांना सादर केला.
त्या नंतर मा. शिक्षणा धिकारी माध्य यांनी सुनावणी घेऊन दस्तावेजा ची तपासणी केली असता मुख्याध्यापक यांच्या वर असलेले आरोप सिद्ध झाल्या मुळे मा. शिक्षणाधिकारी माध्य. यांनी खैरी शिक्षण संस्था खैरी ता. राळेगाव यांना सदर मुख्याध्यापक यांच्या वर निलंबन कारवाईस मान्यता दिली.
संस्थेचे सचिव श्रि. वसंतराव श. जवादे यांनी मुख्याध्यापक श्रि. सिद्धार्थ ना. खैरे यांना निलंबीत केल्याचा आदेश दि. १७ ऑगष्ट २०२२ रोजी जारी केला. सदर मुख्याध्यापका विरोधात केलेली कारवाई ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद केले आहे.