जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव पंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , दहेगाव येथील शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर देऊळकर , तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षीका, डोफे मॅडम ,धुळे मॅडम होते . शाळेतील विद्यार्थी वैष्णवी मेश्राम, योगिता धोटे, ओम हरबडे अथर्व कुबडे, भावेश थुटे,आयुषी हरबडे , आर्या कुबडे, हर्षाली शिवणकर, पूर्वी धनरे , श्रेया चापेकर , श्रावणी धोटे , श्वेता हरबळे, नाझमी शेख , रवीना काळे , तन्वी पवार, निधी काटकर, ज्ञानेश्वरी जोगी, कविता शिवणकर, निशा मेश्राम कोमल आसुटकर , गुंजन दातारकर , अयान शेख, गंधर्व कुबडे , नचिकेत मते कपिल काळे, तनय हरबळे , देवानंद खोके, सुरज खोके, ओम गानफाडे या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन राबविले.
अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपटावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाकरिता शिक्षीका , डोफे मॅडम धुळे मॅडम यांनी सहकार्य केले.